Breaking News

पनवेल शहरात विकासकामांचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल शहरात सुमारे 18 कोटींहून अधिक रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 23) झाले.
पनवेल महपालिका हद्दतील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचा दर्जा उंचवण्यसाठी भारतीय जनता पक्ष कटीबद्ध असून भाजप लोकप्रतिनीधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार कल्पतरु कॉम्पलेक्स ते उरण नाका या मार्गाचे काँक्रिटीकरणासाठी 18 कोटी 52 लाख एक हजार 195 रुपये तर पनवेल महापालिकेच्या मालकीच्या मार्केट यार्ड येथील भुखंडावर प्ले ग्राऊंड विकसीत करण्यासाठी 19 लाख 16 हजार रुपये मंजूर झाले आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे तर प्ले ग्राऊंच्या कामाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
या वेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शहर खजिनदार संजय जैन, उपाध्यक्ष केदार भगत, भाजप नेते के. ए. म्हात्रे, उद्योजक मनोज आंग्रे, युवानेते मयुरेश खिस्मतराव, कल्पतरू सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, महेंद्र पाटील, सुमीत झुंझारराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply