Breaking News

तरघर येथील नवीन समाजमंदिराचा शुभारंभ

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमीला चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. त्यानिमित्ताने दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर नवीन समाजमंदिराचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन तरघर सेक्टर 25 येथे करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आर्थिक मदतीतून या समाजमंदिराचे बांधकाम होणार असून त्यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 24) करण्यात आले.
दसरा हा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जाणारा मुख्य सण आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व असून अनेक अनेक जण या दिवशी नवीन कामाचा शुभारंच करतात. या अंतर्गत तरघर सेक्टर 25 येथ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अर्थसहाय्यातून हे समाज मंधीर बांधण्यात येणार आहेत.
या भूमिमपूजनावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी.देशमुख, डेल्टा बिल्डर्सचे भावेश पटेल, तरघर गावचे अध्यक्ष विठ्ठल ओवळेकर, धीरज ओवळेकर, कामगारनेते महेंद्र घरत, निलेश खारकर, शरद खारकर, कृष्णा खारकर, शैलेश भगत, यशवंत ओवळेकर, रुपेश मोहिते, सुजित मोकल, पत्रकार महादेव पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply