माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पेठाली येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहित केले.
स्पर्धा 6 ते 10 जानेवारीदरम्यान होणार असून प्रथम क्रमांक पटकविणार्या संघास एक लाख रुपये व भव्य चषक, द्वितीय 50 हजार रुपये व भव्य चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकाविणार्या संघास प्रत्येकी 25 हजार रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास माजी नगरसेवक हरेश केणी, भाजप नेते प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, सुनील पाटील, रवी पाटील, बबन पाटील, कैलास घरत, बाळाराम पाटील, अरुण भोईर, अमर पाटील यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मैदानात उतरून फलंदाजी करीत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.