Breaking News

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) झाले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून घंडागाडी उपलब्ध करून देण्यात आली असून या गाडीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे माजी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, उपसरपंच भारती सचिन पाटील, उपसरपंच नितीन धरणेकर, सदस्य मच्छिंद्र पाटील, उमेश भोपी तसेच दीपक पाटील, जयेंद्र पाटील, दीपक म्हात्रे, जयेंद्र नाईक, संदीप पाटील, सचिन पाटील, सुनील पाटील, विश्वजीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होेते.

 

 

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply