Breaking News

जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची तातडीने भरती करा; भाजपची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात नर्सेस भरतीला सुरूवात झाली आहे. येथील स्वच्छतेची समस्या  पाहता चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याचीदेखील  तातडीने भारती करा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रशिक्षीत नर्सेस भरतील सुरुवात झाली आहे. त्याबद्दल डॉ. सुहास माने यांची अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या वेळी कोरोना रुग्णांविषयी सातत्याने येणार्‍या तक्रारीची चर्चा करण्यात आली. रुग्णांना त्यांच्या नातेवाईक, कुटुंबीय यांच्याशी बोलता यावे, यासाठी रुग्णांना मोबाइल वापरण्यास द्यावा, ही मागणी या वेळी भाजप शिष्टमंडळाने केली. अलिबाग पंचायत समिती सदस्य उदय काठे, ज्येष्ठ नेते विकास काठे, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, शहर सरचिटणीस देवेन सोनवणे, युवा नेते निखिल चव्हाण आदी  या वेळी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply