पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून शुक्रवारी (दि. 19) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे नमो चषक भव्य कबड्डी स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार असून स्पर्धा चार गटांत होणार आहे. पुरुष गटात प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय 10 हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी पाच हजार रुपये; महिला गटात प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी तीन हजार रुपये; 19 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी एक हजार रुपये; तर 19 वर्षाखालील मुली गटात प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी एक हजार रुपये तसेच सर्व विजेत्या संघांना चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या नियोजनाची जबादारी भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग, राजेश गायकर, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, प्रदीप भगत, अमोल जाधव, सचिन यमगर यांच्याकडे असून अधिक माहितीसाठी अजय मोरे (9930382060) किंवा अमोल जाधव (7021085079) यांच्याशी संपर्क साधावा.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …