Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वेदिकाला मदतीचा हात

वैद्यकीय उपचारार्थ 50 हजारांची आर्थिक मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी तसेच ज्येष्ठ भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते वेदिकाच्या पालकांकडे शनिवारी (दि. 13) सुपूर्द करण्यात आला. या वेळी भाजप कार्यकर्ते राजेश भालेकर उपस्थित होते.
वेदिका पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील असून तिचे वय अवघे आठ महिने आहे. लहान वयातच तिला ’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराने ग्रासले. 10 हजारांमध्ये एका बालकावर या आजाराचा परिणाम होतो. या आजारामुळे मेरुदंडातील स्नायूंच्या एंट्रॉफी सर्वांत तीव्र आणि जलद स्वरूपाने वाढतात. या आजारात बाळाच्या नसा व स्नायूंवर आक्रमण होते. त्यामुळे श्वासापासून बाकी क्रिया खूप कठीण जातात. वेदिकावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या गंभीर आजाराच्या उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वेदिकाच्या आईवडिलांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेदिकाच्या उपचारासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत दिली आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply