अलिबाग : प्रतिनिधी
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी होणार्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 ते 28 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अलिबाग येथील ब्राह्मणआळीतील श्री राम मंदिरात होईल.
वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक अॅड. श्रीराम ठोसर यांचे श्री वाल्मिकी रामायण या धर्मग्रंथावर आधारित कथारूप प्रवचन सादर होणार आहे. यामध्ये रामायणातील प्रसंगानुसार सुमधुर गीतांचे सादरीकरणही होईल. या कार्यक्रमास मुंबई, पुणे व रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून जाणकार श्रोते उपस्थित राहणार आहेत. अलिबागकरांनीदेखील मोठ्या संख्येने या कथामालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …