पनवेल : रामप्रहर वृत्त
अयोध्या येथील श्री राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.21) पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन हे राम रंगी रंगीले’ हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत व अभंगांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर (डॉ. पटवर्धन हॉस्पिटलसमोर) सायंकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे व गायक जयदीप बगवाडकर श्री रामप्रभूंवरील गीते व अभंग सादर करतील, तर सूत्रसंचालन दीपाली केळकर करणार आहेत. कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारणार्या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी व अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता राम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन, श्री राम अक्षता कलश पूजन आणि प्रातिनिधीक स्वरूपात पनवेलमधील कारसेवकांचा सन्मान केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन (9029580343) आणि गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा तसेच या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभू श्री रामांची सोमवारी पालखी
अयोध्या येथे श्री राम मंदिरात होणार्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये सोमवारी (दि.22) सकाळी 9.30 ते 11 वाजता प्रभू श्री रामाची पालखी काढण्यात येणार आहे. या पालखीला स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरुवात होईल. हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखी फिरून गुजराती शाळा येथे समाप्ती होईल. या ठिकाणी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजता अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, 12.30 ते 8.30 भाविकांसाठी दर्शन आणि सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजता भजन होणार आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …