Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागात साधला कार्यकर्त्यांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
पनवेलच्या धानसर, किरवली, धरणा, धरणा कॅम्प, रोहिंजण, खुटारी, पिसार्वे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक धानसर येथे भाजप तालुका चिटणीस सुरेश पोरजी यांच्या निवासस्थानी झाली. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, उपाध्यक्ष चाहूशेठ पाटील, चिटणीस सुरेश पोरजी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वॉर्ड अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, बूथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी, श्रीपाद पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पोरजी, अक्रम शेख, श्रीपाद म्हात्रे, राजेश महादे, शशिकांत कदम, निहाल ठाकूर, बंडू गोंधळी, अमिर पोरजी, संतोष पाटील, अनंता पोरजी, रामू पोरजी, विठ्ठल गोंधळी, नरेश पोरजी, सुरज गोंधळी, मकबूल शेख, सुधाकर पाटील, सागर घरत, प्रल्हाद भोर्ईर, राजेश तांबोळी, महेश पोरजी, सलमान शेख, सर्वेश घरत, योगेश पाटील, निखिल पाटील, पार्थ पोरजी, सारथी पोरजी, विष्णू पोरजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व प्रमुख पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Check Also

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …

Leave a Reply