परीक्षा रद्द केल्याने पुस्तके विक्रेत्यांचे नुकसान

राज्य शासनाकडून भरपाई मिळण्याची अपेक्षा

उरण : प्रतिनिधी

दहावी, बारावीची सीईटी परीक्षा रद्द झाल्याने पुस्तके खरेदीसाठी उरण शहरासह तालुक्यातील ग्रामीण विभागातील पुस्तके विक्रेत्यांकडे विद्यार्थी फिरकतच नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने या पुस्तक विक्रेत्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुस्तक विक्रेते करीत आहेत.

राज्य शासनाने कोरोना संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक गर्दी होऊ नये, शाळा कॉलेजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी कोरोना बाधित होऊ नये म्हणून दहावी व बारावीची परिक्षा न घेता दोन्ही वर्गातील वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला, मात्र शैक्षणिक परिक्षा न घेतल्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा घेण्याचे राज्य शासनाने निश्चित केले होते. त्यानंतर राज्य शासनाने अचानकपणे दहावी व बारावीच्या सीईटी परिक्षा रद्द केल्याने पुस्तके विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.

मागील दिड ते पावणेदोन वर्षांपासून वाढत्या कोरोना संसर्गामुळे या पुस्तके विक्रेत्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यात आता ही सीईटी परिक्षा मार्गदर्शनाची पुस्तकांचे ढिगारे दुकानात घुळखात पडून राहिल्याने तालुक्यातील मेटाकुटीस आलेल्या पुस्तक विकर्त्यांना अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

पुस्तके विक्रेत्यांना नाममात्र नफ्यावर पुस्तके विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे. त्यातच मागील 16 ते 17 महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे पुस्तके विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला  आहे. त्यात दहावी, बारावीची सीईटीची परिक्षा रद्द झाल्याने पुस्तक विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply