माद्रिद ः वृत्तसंस्था
लिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.
दुसर्या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी 2-0 अशी वाढवली. मेस्सीने 68व्या मिनिटाला आपल्या पदलालित्याच्या जोरावर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर चार मिनिटांनी मेस्सीने आणखी एक गोल करीत बार्सिलोनाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …