पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत आदई गावातील 60 लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि.12) झाला. या कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला असून भाजप या परिसराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून आदईमधील अष्टविनायक गृह संकुल ते बालाजी रेसीडेंन्सि गेट, ओमकार पुरम गेट ते अष्टविनायक गृह संकुल, आई गावदेवी मंदिर ते प्रयाग यश सोसायटी गेट आणि सत्यज्योत सोसायटी गेट ते पुष्पविनायक सोसायटी गेट पर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सरचिटणीस भुपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, जोमा शेळके, रामा पाटील, माजी सरपंच महादू शेळके, जगदीश शेळके, पद्माकर शेळके, ग्रामपंचायत सदस्य श्रीचन भंडारी, राजेश काकडे, जनार्दन पाटील, रोहित पाटील, किरण शेळके, तेजस म्हात्रे, सत्या खाडे, राम शेळके, सुरज पाटील, राहुल पाटील, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, एकर्ना शेळके, श्रीधर शेळके, अशोक पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.