Breaking News

लोधिवलीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील चौक विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून प्रजासत्ताक दिनी लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले.
लोधिवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते विनोद साबळे, लक्ष्मण पारंगे, लक्ष्मण पवार, उत्तम भोईर, प्रवीण जांभळे, गणेश कदम, सचिन तांडेल, एकनाथ सांगळे, प्रभाकर सांगळे, सुरेश पाटील, जनार्दन भुईकोट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शिवसेना लोधिवली शाखा प्रमुख प्रणित सांगळे, ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील, सुशीला भुईकोट, मंगल वाघमारे, माजी सदस्य धनाजी भुईकोट, रमेश माळी यांच्यासह आई एकविरा ग्रुप, राजेश विखारे, रूपेश विखारे, गणेश विखारे, नितीन सांगळे, मंगेश भुईकोट, मंगेश पार्टे, केशव पाटील, बंटी भद्रिके, कविता भुईकोट, पायल सांगळे, राजश्री सांगळे, कविता भद्रिके, भाग्यश्री भद्रिके, आशा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उचित सन्मान राखला जाईल, तसेच लोधिवलीत विकासाची गंगा आणणार असल्याचे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply