Breaking News

कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश

कामोठे : रामप्रहर वृत्त
केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच कामोठे येथे जाहीर सभा झाली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठ्यातील उत्तर भारतीय नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यामध्ये भंडारी यादव, विनय दुबे, संजय सिंह, नरेंद्र दुबे, प्रीयांसू पाठक, निरज तिवारी, कौशल तिवारी, शालिनी सिंग या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.
या वेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्ह्य अध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संतोष शर्मा, जिल्हा सरचिटणीस राजेश पांडेय, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उपाध्याय आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply