खालापूर : प्रतिनिधी : एस. एच. केळकर आणि नॅसीहो सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील 68 अपंग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम अवयव आणि तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. खालापूर पंचायत समितीमध्ये दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील अपंग व्यक्तीची तपासणी व दाखले वाटप मोहीम राबविण्यात आली होती. त्यातील अतिशय गरजू व गरीब अपंग व्यक्तींना एस. एच. केळकर कंपनीच्या माध्यमातून कृत्रिम अवयव, तीनचाकी सायकल व इतर साहित्य वाटप करण्याचे नॅसीहो सामाजिक संस्थेने ठरविले होते. त्यानुसार सोमवारी खालापूरमधील विश्वशांती सभागृहात 68 अपंगाना गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी केळकर ग्रुपच्या जनरल मॅनेजर मीनल आदेश, पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, मोहन सूरपाटणे, राजीव सावंत, संदीप शिर्के, नॅसीहो संस्थेचे जावेद हैदर, योगेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते दिनकर भुजबळ, काशिनाथ पारठे, विशाल वाघमारे, जितेंद्र भोईर, प्रतिक चाळके, संजय ठाकूर, नंदू जांभूळकर यांच्यासह तालुक्यातील अपंग बांधव उपस्थित होते.
Check Also
कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …
RamPrahar – The Panvel Daily Paper