पुणे ः संघाचे स्वयंसेवक कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांत भेटायला गेले व यातील एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी पुन्हा त्या बंद घरी जातात. संध्याकाळीही ते घर बंद असेल, तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा त्या घरी जातात, पण काहीही झाले तरी ते त्या घरातील सदस्यांशी संपर्क साधतातच. त्यांच्या काही गोष्टी आपल्याला पटणार नाहीत, पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी आपल्या कार्यकर्त्यांनीही शिकावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी (दि. 6) कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …