Breaking News

सीकेटी कॉलेजमध्ये एनएसएस दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मंगळवारी (दि.24) 50वा राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या वेळी सर्व प्रथम राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे लक्ष्यगीत सादर केले. त्यानंतर  महाविद्यालयातील उपस्थितीत मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे महत्व सांगून स्वयंसेवकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. राष्ट्रीय सेवा योजना हे स्वयंसेवकांसाठी व्यक्तिमत्व विकासाचे एक व्यासपीठ आहे असे सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी स्वयंसेवकांना देशाच्या उभारणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कशापद्धतीने कार्य करू शकते, याबद्दल माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. योजना मुनीव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply