पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखी पूजन सोहळा, वृक्षदिंडी, वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा, असा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा मानवी नकाशा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, पर्यवेक्षिका इंदूताई घरत, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण, मुख्याध्यापक सुभाष पानकर आदी उपस्थित होते.