Breaking News

जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त

जेएनपीटीने टाऊनशिप येथे जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे शुक्रवारी (दि. 12) उद्घाटन झाले. हे ट्रॉमा केअर सेंटर 24 तास अविरतपणे कार्यरत राहणार असून स्थानिकांसाठी ही एक महत्वाची सुविधा असणार आहे, कारण यामुळे अपघात किंवा इतर गंभीर प्रसंगासाठी खास वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.

उदघाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, ट्रॉमा केअर सेंटर हे रुग्णालयांमध्ये आवश्यक आहे, कारण रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी वेळेवर वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषत: एखादा अपघात झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे आवश्यक असते. आम्हाला आशा आहे की ट्रॉमा केअर सेंटरमुळे बंदराच्या आसपासच्या लोकांना याचा अधिक फायदा होईल आणि जेएनपीटीच्या आसपासच्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळेल. या वेळी जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे, एमजीएम हॉस्पिटल वाशीचे प्रमुख डॉ.नितीन कदम, जेएनपीटीचे कामगार नेते दिनेश पाटील, जेएनपीटीच्या मार्केटिंग अ‍ॅसिस्टंट मॅनेजर अंबिका सिंह, जे. के. म्हात्रे व इतर कर्मचारी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जेएनपीटीच्या मार्केटिंग असिस्टंट मॅनेजर अंबिका सिंह यांनी केले. जेएनपीटी सध्या 50 बेडची सुविधा असलेले रुग्णालय चालवीत असून या ठिकाणी जेएनपीटीचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, आसपासच्या गावातील रुग्ण, इमर्जन्सी रुग्णसेवा, तसेच बंदराशी संबंधित कामकाजासाठी येणार्‍या लोकांना वैद्यकीय सेवा प्रदान केली जाते. जेएनपीटी हे देशातील पहिले असे बंदर बनले आहे ज्याने आपल्या रुग्णालयात प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरु केली आहे. याद्वारे जनसामान्यांना परवडतील, अशा दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि आता ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply