Breaking News

कर्जतमध्ये महापुरुषांच्या नावाच्या पाट्या

कर्जत : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तब्बल 50 लाख खर्चून कर्जत शहरात महापुरुषांच्या नावांचे 190 फलक लागले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये मोठे नामांकन मिळविण्यासाठी कर्जत शहराचे हे बदललेले रूप महत्वाचे ठरणार आहे. कर्जत शहरात आलेल्या नवख्या माणसाला निश्चित स्थळी जाण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी पालिकेने केलेल्या कामाचे बक्षीस यापूर्वी मिळाले आहे. त्या बक्षिसाच्या निधीमधून कर्जत शहरात साइन बोर्डच्या माध्यमातून महापुरुषांच्या नावाचे फलक दिसू लागले आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. आपल्या शहराला भूषण असलेल्या समाजातील  यांची नावे वेगळ्या स्थळांना त्यांना आणि पदपथ तसेच उद्याने यांना असावीत असे मला सातत्याने वाटत होते. त्यामुळे नगरसेविका म्हणून पाच वर्षे विचार केला होता.

एकूण 190 फलक लावले : शहरातील  दहिवली भागातील उद्यानांना सद्गुरुकृपा उद्यान, साईनगर उद्यान, सुवर्णजयंती उद्यान, नाना नानी पार्क, मीनाताई ठाकरे उद्यान अशी नावे देण्यात आली आहेत. कर्जत शहरात असे 190 बोर्ड लावले जात आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे शहराचे रूपडे पालटले आहे. कर्जत शहरातील रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.शहरात प्रवेश केल्यानंतर मुख्य रस्त्याला निरुपणकार तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिले जात आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांना तालुक्यातील दोन हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची नावे तसेच प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्य सावरकर, वासुदेव बळवंत फडके, कर्जत शहरातील स्वतंत्रसैनिक बाळासाहेब ठोस यांच्यासह भारतरत्न डॉ. एपी अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, हुतात्मा बाबू गेनू, बसवेश्वर महाराज, जनरल अरुणकुमा वैद्य, सरखेल कान्होजी आंग्रे, गाडगेबाबा यांच्यासह क्रांतिकारकांची देण्यात आली आहेत.

शहरातील चौक, रस्ते, उद्याने यांना महापुरूषांची नावे देण्यात येत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियान यासाठी हे वेगळे काम महत्त्वाचे ठरेल.

-सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा, कर्जत नगर परिषद

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply