पुणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतक्या वर्षांपासून कोतवाल चावडीत भव्य मंडप उभारून या गणपतीची प्रतिष्ठापना होत असते. 127 वर्षांची ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मंडळाने सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे.
यंदाचा उत्सव मंदिरात साजरा करीत असताना भक्तांना बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंदिरात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेता येणार आहे. उत्सवाचे आकर्षण असलेले महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण, विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात उत्सव साजरा करीत असताना आरोग्यविषयक जनजागृती तसेच आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
Check Also
उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …