खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर तालुक्यातील वावंढळ गावच्या हद्दीत शनिवारी (दि. 20) एक इंडिका कार बाजूला असणार्या पाण्याच्या डबक्यात जाऊन कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला. ही कार 20 मीटर रस्ता सोडून बाजूला असणार्या डबक्यात पडली.