Breaking News

गुरुद्वारात मोफत नेत्रतपासणी शिबिर

नवी मुंबई ः प्रतिनिधी

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांचे आरोग्य जपणार्‍या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे खारघर येथील गुरुद्वारामध्ये नुकतेच मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात 156 नागरिकांनी सहभाग घेतला व यातील 32 नागरिकांना नेत्रपटलाशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील तपासणीसाठी खारघर येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटमध्ये बोलाविण्यात आले आहे. अनेक मधुमेही रुग्ण नियमित नेत्रतपासणी करून घेत नाहीत. अशा रुग्णांची ज्यावेळी दृष्टी कमी होते तेव्हा हे मधुमेही रुग्ण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी ही समस्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचलेली असते. एकदा जर तुमची दृष्टी गेली, तर ती परत येत नाही, हाच संदेश आम्ही जागतिक मधुमेह दिनानिमित्त आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांतून महिनाभर देणार असून यामध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिरे, डॉक्टरांची कार्यशाळा तसेच मधुमेही रुग्णांच्या समुपदेशनाचा समावेश असणार आहे, अशी माहिती लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे व्हिट्रो रेटिनलतज्ञ डॉ. देवेंद्र वेंकटरामानी यांनी दिली.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply