Saturday , June 3 2023
Breaking News

ऑस्ट्रेलियाचा रिचर्डसन दुखापतीमुळे मायदेशी

बेंगळुरू : वृत्तसंस्था

भारताविरुद्धच्या घरच्या मालिकेत मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारत दौर्‍यात विजयाने सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर भारताच्या तोंडचा घास पळवला, मात्र  त्यांचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसन याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना रिचर्डसनला दुखापत झाली होती. 28 वर्षीय रिचर्डसनने मंगळवारी ऑसी संघासोबत सराव केला, परंतु त्याने सराव अर्ध्यावर सोडला. अँड्र्यू टायला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. टायने सात आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्याने बिग बॅश लीगमध्ये 14 सामन्यांत पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना 17 विकेट्स घेतल्या आहेत.

रिचर्डसनला दुखापत झाली होती. दुर्दैवाने तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे त्याला मायदेशी परत जावे लागत आहे.
-डेव्हिड बिक्ली, ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओ

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply