Breaking News

भीषण अपघातात नऊ युवकांचा मृत्यू

हडपसर : प्रतिनिधी

पुणे-सोलापूर मार्गावर लोणी काळभोर वाक वस्ती येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन कारमधील नऊ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रायगडला सहलीला गेलेलेे हे सर्व जण घरी परतत असताना शनिवारी

(दि. 20) मध्यरात्री त्यांच्यावर काळाने झडप घातली.

यवत येथील रहिवासी असलेल्या तरुणांची इर्टीका कार शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास लोणी काळभोर वाक वस्ती येथे आल्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणार्‍या ट्रकने कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकने कारला सुमारे 100 फूट फरफटत नेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये शुभम रामदास भिसे (19), विशाल सुभाष यादव (20), निखिल चंद्रकांत वाबळे (20), अक्षय चंद्रकांत शिगे (20), ऋषिकेश गणेश यादव (20), अक्षय भरत वायकर (22), नूरमोहम्मद आबास दाया (22), परवेज अशपाक आतार (21), जुबेर अजीज मुलाणी (21) यांचा समावेश आहे.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply