Breaking News

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ’असाही’ एक विक्रम!

इंग्लंड ः वृत्तसंस्था

इंग्लंड आणि आयर्लंडदरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावांत, तर आयर्लंडचा संघ 38 धावांत बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भुत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्‍यांदाच हा विक्रम घडला आहे आणि त्याहून विशेष म्हणजे 1999पर्यंत कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम घडलेला नव्हता. हा विक्रम म्हणजे कसोटी सामन्याच्या चारही डावांत एका क्रमांकावर फलंदाजी करणारे शून्यावर बाद झाले. सध्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर लॉर्ड्स कसोटीत सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत हा अविश्वसनीय योगायोग घडून आला. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर इंग्लंडच्या मोईन अलीने पहिल्या डावात व जॉनी बेयरस्टोने दुसर्‍या डावात, तर आयर्लंडच्या जी. सी. विल्सनने दोन्ही डावांत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली, तसेच मोईन अली, जॉनी बेयरस्टो व जी. सी. विल्सन हे तिघेही फलंदाज शून्यावरच बाद झाले. याआधी मार्च 1999मध्ये असे घडले होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजदरम्यानचा तो पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामना होता. त्यात दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत असे घडले होते. स्ट्युअर्ट मॅक्गील, मार्व्हन डिल्लन व पी. टी. कॉलिन्सने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली, पण धावांचे खाते खोलू शकले नव्हते. चारही डावांत दहाव्या क्रमांकावरचे हे फलंदाज त्रिफळाबाद झाले होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply