रोहे ः प्रतिनिधी
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत दापोली कृषी महाविद्यालयातील कृषीदुतांनी रोहे तालुक्यात ठिकठिकाणी कलम बांधण्याच्या विविध पद्धती व बोर्डो मिश्रण तयार करणे यावर प्रात्याक्षिके सादर केली. तसेच कलमे बांधून त्यापासून अर्थार्जन करण्याचे उपाय शेतकर्यांना सांगीतले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, नवीन जाती, कृषी विभागाच्या योजना आदी विषयांची माहिती कृषीदुतांकडून शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यात येत असून, अनेक प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. प्रात्याक्षिकाच्यावेळी गट प्रमुख गणेश चव्हाण यांनी रोपवाटीका तयार करणे व कमी खर्चात रोपे तयार करण्याची पद्धत शेतकर्यांना दाखवून दिली. कृषी भुषण गटाचे सदस्य तृप्तेश गावडे यांनी बोर्डो मिश्रण तयार करून त्याचे फायदे शेतकर्यांना समजावून सांगितले. या प्रात्याक्षिकांसाठी उद्यानविद्या विभागाचे येलमार व माळी कामगार म्हादलेकर हे उपस्थित होते. त्यांनी कोमकालम पद्धतीचे महत्व सांगीतले. यावेळी जीवन आरेकर, डॉ. राजेश मांजरेकर व कृषी विद्यालयाचे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. आर. टी. भिगोर्डे यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच राम गिजे, तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम गिजे, ग्रामपंचायत सदस्या हर्षदा घाणेकर, तसेच देवराम मोरे, संतोष घाणेकर, काशीनाथ घाणेकर यांच्यासह शेतकरी आणि अॅग्री युथ, भूमीपुत्र व कृषी संकल्प हे गट उपस्थित होते. उपस्थित शेतकर्यांना प्रत्येकी एक कलमाचे रोप देण्यात आले.