Breaking News

नागोठणे शहरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत

Exif_JPEG_420
Exif_JPEG_420

नागोठणे : प्रतिनिधी

अलिकडे झालेल्या अतिवृष्टीने नागोठणे शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती. यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या चार नागरिकांना येथील ग्रामपंचायतीने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला होता. या धनादेशाचे वितरण शुक्रवारी (दि. 2) ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. नागोठण्यातील राजेंद्र नागोठणेकर (कुंभारआळी), दीपक बोरकर (खडकआळी), महंमद हनिफ पोत्रिक (मोहल्ला) आणि जैनम आदम शेख (मिरानगर) यांना यावेळी धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, पांडुरंग कोळी, संतोष जोशी, रत्नदीप ताडकर, दिलीप तेलंगे, वैभव चितळकर, प्रकाश कांबळे, महाडिक आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply