Breaking News

‘सीकेटी’च्या विनितला कुस्तीत सुवर्णपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्‍या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात आली होती.

भारताच्या सर्वच राज्यांतील विद्यार्थी कुस्तीवीर या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम फेरीत हरियाणाच्या सुजीत कुमारला चीत करीत विनितने सुवर्णपदकावर नाव कोरले.

विनितने या स्पर्धेकरिता कसून तयारी केली होती, तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते, असे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले. विनितचे सीकेटी परिवाराकडून कौतुक होत आहे.

या ‘सुवर्ण’ यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विनित गुप्ता याचे अभिनंदन केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply