Breaking News

मानवाधिकार संघटनेकडून पालिका सफाई कामगारांना फराळ वाटप

मुरुड जंजिरा ः वार्ताहर            

मुरुड नगर पारिषदेतील सफाई कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मानवाधिकार संघटनेकडून दिवाळी फराळ व त्यांच्या मुलांसाठी वही, पेन अशा शालोपयोगी वस्तूंचे वाटप नगरपरिषद आवारात रविवारी (दि.27)करण्यात आले. मुरुड शहराची स्वछता अबाधित राखण्याचे काम सफाई कर्मचारी करीत असतात. अत्यंत तुटपुंज्या पगारात शहराची स्वछता राखण्याचे ते काम करीत असल्याने यंदा सफाई कर्मचार्‍यांचा विशेष गौरवसुद्धा मानवाधिकार संघटनेकडून करण्यात आला होता. या वेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहीद फकजी, मानवाधिकार संघटनेचे सदस्य मुबीन खान, अंकित गुरव, हर्षद साठे, मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय करडे, गणेश चोडणेकर आदींसह असंख्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply