Breaking News

दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या फलकाचे अनावरण

आमदार प्रशांत ठाकूर सल्लागारपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त

तळोजा येथील दीपक नाईट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या बोर्डच्या उद्घाटन समारंभाचे शुक्रवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले आहे. या फलकाचे अनावरण सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या युनियनच्या सल्लागारपदी आमदार प्रशांत ठाकूर आणि अध्यक्षपदी कामगारनेते जितेंद्र घरत यांनी निवड झाली आहे. या कार्यक्रमाला जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सविंद्र कोरडे, संतोष घरत, दीपक पाटील, अशोक साळुंके, भाजप युवा मोर्चा पनवेल महानगरपालिका अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply