Breaking News

कर्जतमध्ये राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा

माजी आमदार देवेंद्र साटम यांचे आवाहन

कडाव : वार्ताहर : लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण एकजूटीने महायुतीचा खासदार निवडून देऊन कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी शिवसेना, आरपीआयच्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित व एकसंघपणे काम करा आपला विजय कोणीच रोखू शकणार नाही, या निवडणुकीत कर्जतमधून राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करा, असे आवाहन माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केला आहे.

आगामी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने एक निर्णायक पाऊल पुढे टाकत खांडस जिल्हा परिषद वार्डमध्ये रविवारी (दि. 17) कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या अध्यक्षतेखाली व तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र साटम बोलत होते.

कळंब परिसरातील सुतारपाडा येथील एका फॉर्म हाऊसवर भाजपच्या कर्जत मंडळाच्या झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांत मोठा उत्साह होता. त्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजाराम शेळके यांची भाजपच्या कर्जत तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सचिन म्हसकर यांची तालुका उपाध्यक्षपदी, तर केशव तरे यांची दहिवली पंचायत समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

त्या वेळी या कार्यक्रमासाठी प्रज्ञा प्रकोष्ठचे कोकण विभाग अध्यक्ष नितीन कांदळगावकर, जिल्हा चिटणिस रमेश मुंढे, जेष्ठ नेते राजाराम शेळके, कर्जत खालापूर विधानसभा सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष विलास श्रीखंडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पिंपरकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल नजे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भगत, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष फुरकान कुरेशी, उपाध्यक्ष स्वप्निल खंबाले, महिला तालुकाध्यक्ष सुगंधा भोसले, नगरसेवक बळवंत घुमरे, स्वामिनी मांजरे, विनायक पवार, संतोष एंनकर, अंकुश मुने आदी पदाधिकार्‍यांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply