Breaking News

कोकणरत्न पर्यटन संस्थेच्या माध्यमातून डोंगर पर्यटनाला चालना देणार -प्रकाश मोरे

नागोठणे : प्रतिनिधी

कोकणचे वैभव असणार्‍या डोंगरांवर पर्यटक आणून आदिवासी बांधवांना एक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी व्यक्त केला.

आदिवासी बांधवांची डोंगरावरची संस्कृती ज्ञात व्हावी यासाठी वासगाव, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, ढोकवाडी, कातळा, चेराठी, काळकाई व परिसरातील इतर डोंगरांवर पर्यटकांना आदिवासींचे पारंपरिक नृत्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांनी डोंगरावर पिकवलेल्या भाजी, फळे, वरी, नाचणी, तांदूळ पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. हा रानमेवा तसेच रानभाज्या नागोठणे रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रवाशांना उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आदिवासी बांधवांना दुकान गाळा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विभागातील रामेश्वर वैभव, सुधागड, सरसगड, भोराई, अवचितगड, घोसाळगड, तळागड येथे पर्यटक आणण्यासाठी शिवाजी ट्रेल, गडदुर्ग संस्थेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला असल्याचे मोरे यांनी सांगितले. खार्‍या पाण्यातील जिताडा, पाला, कोलंबी, चिवणी, चिंबोरीसह इतर मासे शेततळ्यावर उपलब्ध करून देताना या चविष्ट मांसाहारी पदार्थांची पर्यटकांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. पर्यटनविषयक माहिती पर्यटकांना उपलब्ध होण्यासाठी संबंधित माहितीचा अ‍ॅप्स लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply