गुळसुंदे विद्यालयात शैक्षणिक अ‍ॅप; कृणाल पाटील यांचे दातृत्व

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाळांमध्ये अध्यापन-अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी तंत्रज्ञानचा वापर करावा, या उद्देशाने तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी ब्रिक्सलिएन्ट या संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक अ‍ॅपची भेट मिळवून दिली.

या अ‍ॅप्सचे उद्घाटन ब्रिक्सलिएन्ट संस्थेचे मार्केटिंग मॅनेजर कृणाल पाटील,   स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आर. डी. पाटील, उपाध्यक्ष भाई गुढेकर, स्कूल कमिटी सदस्य चंद्रकांत पाटील, सखाराम पाटील, मिलिंद वैद्य, अनिल पाटील, प्रशांत पाटील, नरेश चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुतार यांच्या उपस्थितीत पार पडले. या अ‍ॅप्सची सुविधा विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर करून देण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थी आपल्या इयत्तेचा अभ्यास प्रश्न सराव, व्हिडीओ, कृती यांच्या माध्यमातून स्वतः करणार आहे. हा अ‍ॅप सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत दिल्याबद्दल कृणाल पाटील यांचा विद्यालय स्कूल कमिटीच्या मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या शैक्षणिक अ‍ॅपचा वापर विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसाठी करावा, तसेच त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना अनिल पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले. या उपक्रमाला अध्यक्ष आर. डी.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक सुतार यांनी अ‍ॅपची सुविधा विद्यालयाला मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल कृणाल पाटील यांचे आभार मानले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply