Breaking News

अदाड गावातील कार्यकर्ते भाजपमध्ये

मुरूड : प्रतिनिधी

खोटी आश्वासने देऊन कोणतेही काम कधीच पूर्ण न करणे ही शेकापची खासियत आहे. 10 वर्षांपासून एकही विकासकाम शेकापकडून पूर्ण होत नाही म्हणून नाराज असलेल्या उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अदाड गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्या सर्व इच्छा भाजपच्या माध्यमातून निश्चित पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास भाजपचे अलिबाग -मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी नांदगाव येथे व्यक्त केला.

मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील माळी समाज हॉलमध्ये रविवारी (दि. 29) झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील अदाड गावासह खारीकवाडा दोडकुल्ला येथील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे अ‍ॅड. मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. त्या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासाचा महामेरू उभा केल्याने इतर पक्षांतील लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. शेकापने आजपर्यंत लोकांना फसवण्याचे काम केले आहे. अलिबाग, मुरूडचा विकास या पक्षाला करताच आला नाही. आता लोक सजग झाले असून, आगामी निवडणुकीत या

मतदारसंघातील लोक शेकापला त्याची जागा दाखवतील, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, प्रकाश धुमाळ, अनंतराव देशमुख, जयवंत अंबाजी यांची भाषणे झाली. या वेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या मेघा कुलकर्णी यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिंदे यांनी केले. अ‍ॅड. परेश देशमुख, परशुराम म्हात्रे, उदय काठे, महेंद्र चोळकर, शैलेश  काते, प्रवीण बेकार, रोहन खोपकर, समीर  शिंदे, उमेश  माळी, विनोद भगत, अभिजित पानवलकर, महेश मानकर, अलका मोंनाक, श्रमिका खोत यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply