Breaking News

कुर्डूस ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील यांनी बुधवारी (दि. 2) तीन ग्रामपंचायत सदस्य आणि मुख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कुर्डूस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील यांनी तीन ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक समर्थकांसह बुधवारी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील कार्यालयात जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये स्वागत केले. अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, अलिबाग मुरूड विधानसभा सरचिटणीस परेश देशमुख, युवा मोर्चा अलिबाग तालुकाध्यक्ष अमित म्हात्रे, कुर्डूस विभाग अध्यक्ष अमित पाटील, सरपंच सुजित गावंड यांच्यासह नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले  बामणगाव (ता. अलिबाग) ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार राऊत, उपसरपंच मेघा थळे, सदस्य ममता भादाणकर, चैताली पाटील, चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply