Breaking News

बेटी बचाओ, बेटी पढाओनिमित्त प्रभात फेरी

पोलादपूर : प्रतिनिधी : बेटी बचाव बेटी पढाव सप्ताहानिमित्त येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूरमध्ये नुकताच प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रभातफेरीच्या शुभारंभाला पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, गटशिक्षणाधिकारी साळुंखे, बालविकास प्रकल्प अधिकारी बने, प्राचार्य केंजळे, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

मुंबई – गोवा महामार्गालगतच्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापासून  निघालेली ही प्रभातफेरी पोलादपूर बाजारपेठ आणि भैरवनाथनगर सहाणेपासून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आली. तेथे प्रभातफेरीची सांगता झाली. या प्रभातफेरीमध्ये तालुक्यातील अंगणवाडीसेविका, सहाय्यक आणि रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिराचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सांगता समारंभात बेटी बचाओ बेटी पढाओ सप्ताहानिमित्त उपस्थितांनी शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बने यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ सप्ताहाचे स्वरूप विषद केले. गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी, ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ‘ ही सर्वव्यापी चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सृष्टी सुळे या विद्यार्थिनीचे मनोगत सर्वांचे मन जिंकणारे झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास सेवा योजना कार्यालयाचे विस्तार अधिकारी गोविंद फड यांनी केले तर महाडच्या दिलासा फाऊंडेशनने पथनाटय सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालविकास सेवा योजना कार्यालयाचे विस्तार अधिकारी गोविंद फड, पर्यवेक्षिका सुविधा मिरगळ, माधुरी फड तसेच माधवी वांजळे, भारत पवार व तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply