Breaking News

पनवेल महानगरपालिका हद्दीत होणार 100 कोटींची विकासकामे

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सिडको परिसरात विकासाला वेग आला आहे. सिडकोच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्याचे काम होत असून, पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 100 कोटी रुपयांची विकासकामे होणार आहेत. यामध्ये नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा येथे रस्ते, पदपथ, गटारे, पाणीपुरवठा अशा पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

नवीन पनवेल सेक्टर 1 ते 11 (पूर्व)मध्ये पदपथ दुरुस्तीसाठी आठ कोटी 53 लाख 58 हजार रुपये,  सेक्टर 1 ते 11 (पूर्व)मध्ये रस्ते दुरुस्तीसाठी नऊ कोटी 25 लाख 34 हजार रुपये, सेक्टर 1 ते 18 (पश्चिम)मध्ये पदपथ दुरुस्तीसाठी सहा कोटी 54 लाख 99 हजार रुपये, सेक्टर 2 ते 6, सेक्टर 11 व 12 आणि सेक्टर 14 ते 17 (पूर्व)मधील रस्ते दुरुस्तीकरिता नऊ कोटी 95 लाख 42 हजार रुपये, सेक्टर 12 ते 19 (पूर्व) येथील गटार व पदपथ कामासाठी आठ कोटी 57 लाख 99 हजार रुपये, सेक्टर 3, 12 व 16 (पूर्व)मधील अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी एक कोटी 50 लाख, सेक्टर 11 (पूर्व)मध्ये इएसआर दुरुस्तीसाठी दोन कोटी, नवीन पनवेलमधील उद्यान आणि मैदानाची दुरुस्ती, तसेच खेळणी साहित्यकृती याकरिता 40 लाख 82 हजार रुपये, काळुंद्रे येथील रस्ते, गटार व पदपथासाठी एक कोटी 78 लाख 70 हजार रुपये, नवीन पनवेलमधील सिडको फायर स्टेशन, तसेच स्टाफ क्वार्टर्स, विभागीय इमारत व पंप हाऊस दुरुस्तीसाठी दोन कोटी 13 लाख 90 हजार रुपये, तळोजा पाचनंद फेज 1मधील सेक्टर 2, 4, 5, 7, 8, 9, 10, 11 आणि 17 येथील रस्ते, पदपथ, गटार आदी कामांसाठी एक कोटी 32 लाख 38 हजार, खारघर सेक्टर 2 ते 11मधील रस्ते व पदपथ दुरुस्तीसाठी 62 लाख 47 हजार, सेक्टर 3मधील पदपथ आणि सब वेमधील रस्ता दुरुस्तीसाठी 32 लाख 19 हजार, सेक्टर 1 ते 11मधील, तसेच पदपथ दुरुस्तीकरिता तीन कोटी 50 लाख, कामोठ्यातील सेक्टर 5 ते 12, 14, 24 आणि 31 ते 36मधील रस्ते, पदपथ, गटारे, बगीचे व मैदानाच्या विकासासाठी 11 कोटी 27 लाख रुपये, कळंबोली सेक्टर 1 ते 23 आणि 1 इ ते 16 इ मध्ये रस्ते, पदपथ, गटार, उघड्या भूखंडावरील मलबे काढणे आदी कामांसाठी 10 कोटी 68 लाख, खारघरमधील सेक्टर 12 ते 21 रस्ते, पदपथ, गटारे, सेक्टर 16 व 17मधील सर्व्हिस रोड, सेक्टर 12 ते 18 गटारे दुरुस्त करण्याच्या कामासाठी 12 कोटी 75 लाख, सेक्टर 12मधील कम्युनिटी सेंटरच्या दुरुस्तीसाठी 41 लाख 75 हजार, सेक्टर 14 येथे गॅस शवदाहिनीसाठी एक कोटी 54 लाख, सेक्टर 14मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी 64 लाख, सेक्टर 14मध्ये हिंदू स्मशानभूमीसाठी 11 लाख 65 हजार, सेक्टर 12 ते 21मधील गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंगला

थर्मोप्लास्टिक रंग लावण्यासाठी 11 लाख 13 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकूण 100 कोटी रुपयांची विकासकामे महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये होणार आहेत.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply