Breaking News

पनवेल मतदारसंघात सबकुछ भाजप

चिंध्रण येथे शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावात ग्रामीण भागात सुरू आहे. त्या प्रचारांतर्गत खैरवाडी गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शनिवारी (दि. 12) जहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत चिंध्रण येथे झाला.

भारतीय जनता पार्टीची ग्रमीण भागात ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याअंतर्गत खैरवाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या श्रावण भगत, गणेश भगत, गौरव भगत, कृष्णा भगत, रूपेश भगत, राम भगत, रामा भगत, अनंता भगत, अशोक भगत, राजेश भगत, बाळकृष्ण कातकरी, चंद्रकांत निरगुडा यांनी पक्षाला राम राम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, अशोक साळुंखे, खैरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच आनंता खैर, माजी सरपंच जनार्दन कोळंबेकर, खैरवाडी ग्रामपंचायत सदस्य हाणूमन खैर, शिरवली ग्रामपंचायत सदस्य जनार्दन भगत, पत्रकार किसन पारधी, गणेश पाटील, रवी पाटील, भास्कर नावडेकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग 14 मधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. पनवेल महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील शेकापचे धडाडीचे कार्यकर्ते पांडुरंग मोकल आणि अनंत शिवकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा शनिवारी (दि. 12) झाला.

पनवेलमधील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष सचिन गमरे, गणेश म्हात्रे, शावेज रिजवी, हेमंत म्हात्रे, अजित पाटील, रूपेश घाग, मयूर शेळके, संदीप शेलार उपस्थित होते.

विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात खारघर आणि वळवली येथील काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 13) झाला.

पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मडंळाच्या सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी कळंबोली येथील शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दया नरवडे, सुरेश ठोंबरे, सोहम सूर्यवंशी, प्रथमेश जानकर, धनंजय दवेकर, तनय देवकर, अभिजीत कदम, रोहित शिंदे, विशाल सरगर, विवेक लवटे, प्रकाश यमगर, तुषार यमगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, तसेच खारघर आणि वळवली येथील आरपीआयचे धमेंद्र यादव, विकी मुजालदे, अजित खेडेकर, राहुल काळे, मंजीत सिंग, दशरथ खेडेकर, विशाल भालेकर, किशोर हिरवे, नरेंद्र शितोले, आकाश कांबळे, भीम चव्हाण, सागर कोळी, महेश आठवले, आकाश जयदर, शेखर कोळी, महेंद्र भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, भाजप युवामोर्चा कळंबोली शहर अध्यक्ष अमर ठाकूर, मारुती चिपळेकर, जमीर शेख, गुरुनाथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply