पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील साखर आदिवासीवाडीतील बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप करून पोलादपूर शहरातील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांच्या सदस्यांनी आगळीवेगळी दिवाळी पहाट साजरी केली.
येथील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांनी दिवाळीनिमित्त साखर आदिवासीवाडीतील प्रत्येक घरामध्ये मिठाई आणि फराळाचे वाटप केले. या उपक्रमात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद चव्हाण, टायगर ग्रुपचे अध्यक्ष विशाल दरेकर, राहुल जाधव, अभिषेक शिंदे, मनोज चव्हाण, सुजल अहिरे, रूपेश झाडाणे, आदित्य जाधव, गणेश कदम, बंटी कदम, ओंकार मोहिते यांच्यासह त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.