Breaking News

रोटरी क्लबतर्फे मुलींसाठी स्वच्छतागृह

कामोठे ः रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीज-टाऊन पनवेल व रोटरी क्लब ऑफ कामोठे-पनवेल यांच्यामार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे यांच्या वतीने रोटरी क्लबकडे मुलींच्या स्वच्छतागृहाची मागणी केली असता रोटरी क्लब ऑफ कामोठे पनवेलचे अध्यक्ष डॉ. शशिकांत म्हात्रे यांनी लगेच या कामाला मंजुरी दिली.

त्यानुसार रोटरी क्लब यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन गुरुवार (दि. 27) प्रफुल्ल धानोरकर-असिस्टंट गव्हर्नर जिल्हा रोटरी क्लब 3131 यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, डॉ. शशिकांत म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन स्वामी अप्पा म्हात्रे, व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील, माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर, रवी जोशी, स्कूल कमिटी सदस्य संतोष पाटील, किशोर गोवारी, मुख्याध्यापक श्री. गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे विद्यालयामार्फत स्वागत करण्यात आले. डॉ. शशिकांत म्हात्रे व व्ही. सी. म्हात्रे यांनी मनोगतातून स्वच्छतेचे महत्त्व सांगून रोटरीने बांधून दिलेल्या मुलींचे स्वच्छतागृह स्वच्छ ठेवले जावे, अशी अशा व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री. साळुंखे यांनी केले, तर आभार एस. पी. पाटील यांनी मानले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply