Breaking News

देशात कोरोना लसीकरणाला लवकरच होणार सुरुवात

पूर्वतयारीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीयांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने करीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत माहिती दिली.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर सरकारने प्राधान्यक्रम ठरवला असून, त्यानुसार देशातील 30 कोटी जनतेला लस देण्यात येईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोरोना काळात लढणारे आघाडीचे कर्मचारी जसे पोलीस, सैन्य आणि स्वच्छता कर्मचारी, 50पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती तसेच 50 वर्षांपेक्षा कमी, पण विशिष्ट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल.
आमचा प्रयत्न आहे की प्राधान्यक्रमाच्या यादीतील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक लस मिळावी. लशीच्या अनिश्चिततेबाबत निर्माण झालेल्या अडचणीबाबत आम्ही माहिती देत राहू, पण जर एखाद्याने ठरवले की त्याला लस नको आहे तर आम्ही त्याला जबरदस्ती करू शकत नाही, असेही डॉ. वर्धन यांनी स्पष्ट केले.
ज्याप्रमाणे पोलिओचे निर्मूलन करणे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य झाले, त्याप्रमाणेच शेवटी कोरोनाचा संसर्गदेखील कमी होईल आणि हा आजारही साधारण होऊन जाईल, असा विश्वास या वेळी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply