पेण ः प्रतिनिधी
46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत संकेत केशव म्हात्रे याने सात पदकांची कमाई केली. संकेत हा पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावचा सुपुत्र असून, तो नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 100 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 400 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 1500 मीटर फ्री स्टाइल (रजत), 4 बाय 100 रिले (रजत), 150 मीटर रिले (रजत), 200 मीटर आय (कांस्य) या सात पदकांची कमाई केली असून संकेतने वर्षभरात 108 पदकांची कमाई केली आहे.
वर्षभरात हैदराबाद, अमरावती, किल्ला, उरण अशा अनेक ठिकाणी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्याने या पदकांची कमाई केली. दोन वर्षांपूर्वी मोरा ते गेटवे हे अंतरदेखील त्याने पार केले.
46व्या कोकण परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग येथे एकूण 108 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत संकेत म्हात्रेची कामगिरी उल्लेखनीय असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पाटणेश्वर गावच्या सुपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपली खेळाची आवड जोपासत मुंबई पोलीसमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर दाखल झाला.