Breaking News

उरणमध्ये 19वा द्रोणागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

उरण ः प्रतिनिधी

कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उरणमधील द्रोणागिरी स्पोर्ट्स

असोसिएशनच्या माध्यमातून 19व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा महोत्सव उरण शहरातील वीर सावरकर मैदानावर शुक्रवार (दि. 20) ते मंगळवार (दि. 24) या कालावधीत पार पडणार आहे.

खेळाडू, कलाकार आदी स्पर्धकांसाठी एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन गेली 19 वर्षे करीत आहे. उरणमधील सर्वांत मोठा युवा महोत्सव असल्याने महोत्सवाला सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सिने अभिनेते आवर्जून भेट देतात. यावर्षीही नृत्य, धनुष्य स्पर्धा, अ‍ॅथलेटिक्स, देशी खेळ, मैदानी खेळ आदी कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित 120हून अधिक वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना द्रोणागिरी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. जास्तीत जास्त खेळाडू, कलाकार व स्पर्धकांनी या महोत्सवात भाग घ्यावा, असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे.

स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर असून स्पर्धकांनी आपले अर्ज व

नावनोंदणी गौरीनंदन अपार्टमेंट, शॉप नंबर 7, चारफाटा, उरण, जि. रायगड, पिन 400702, ऑफिस नंबर 022-27224498 येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत करावी. dronagiri.sportsgmail.com या ई-मेलद्वारेही प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply