Tuesday , February 7 2023

हैदराबाद घटनेवर विराट संतप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील दिग्गज

खेळाडूंनीही याबद्दल  तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते अगदीच लज्जास्पद आहे, असे ट्विट करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संताप आणि दुःख व्यक्त केले.

’हैदराबादमध्ये जे घडलं, ते लज्जास्पद आहे. एक समाज म्हणून पुढे येऊन अशा अमानवी कृत्यांचा विनाश करण्याची वेळ आली आहे,’ असं विराट म्हणाला. त्याआधी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारताचा सलामीवीर शिखर धवन यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. हरभजन सिंग यानेही संताप व्यक्त केला. ’देश कुणाचाही असो, जेव्हा माणुसकी मरते, त्यावेळी अवघा जग रडतो,’ असे इरफान पठाण म्हणाला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply