महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात कोरोनाच्या नव्या 19 रुग्णांची सोमवारी (दि. 27) नोंद झाली असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे सहा जण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
महाड तालुक्यात नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये महाड, खरवली, बिरवाडी-बापटनगर, श्रीजीआर एसबीआय बँक, केएसएफ कॉलनी नांगलवाडी, कौमुदी आर्केड रोहिदास नगर, शेलटोली, नवेनगर, तांबटभुवन, स्नेहरमण, काळीज, पानसर मोहल्ला येथील नागरिकांचा समावेश आहे, तर महाडमधील 44 व 60 पुरुष आणि 34 स्त्री, महाड 45 पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर नवेनगर व बिरवाडी येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 172 रुग्ण उपचार घेत असून, एकूण 156 बरे झाले आहेत.
मुरूडमध्ये 14 जणांना लागण
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांमध्ये 14ने भर पडली आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 136 झाली आहे. आतापर्यंत 71 रुग्ण जणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, तर नऊ जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित 56 जणांवर उपचार सुरू आहेत. नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी ही माहिती दिली.
मुरूड तालुक्यातील चोरढे गावात पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शहरापासून काही अंतरावर असणार्या राजपुरी गावांमध्ये तीन दिवसांत 21 रुग्णांची नोंद झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचे कोरोनामुळे निधन
माणगाव : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील वाळीव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांचे कोरोनाशी लढताना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांनी माणगाव पोलीस ठाणे तसेच गोरेगाव पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावली होती. शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल माणगाव व गोरेगाव पोलीस ठाण्यात पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली.