Breaking News

एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी

पेण-खोपोली मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत एसटी बस अडवून  बस चालकाला शिवीगाळी करून एसटी बसचे दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात  पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटी बस (एमएच-20,डी-8921) गुरूवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता पेण-खोपोली मार्गाने जात होती. धामणी गावाच्या हद्दीत  टेम्पो (एमएच-06,जी-7437) वरील अज्ञात चालकाने एसटी बस रस्त्यात अडवली व बस चालकास शिवीगाळ करून त्याने एसटी बसच्या दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केले.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्य्क फौजदार तडवी हे करीत आहेत.

Check Also

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …

Leave a Reply