Breaking News

भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्या -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 6) झाली. या वेळी त्यांनी उरण मतदारसंघात सुरू असलेल्या सदस्य नोंदणीचा आढावा घेत या मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने गावागावात आणि घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत त्यांना भाजप परिवारात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले.
या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारूशीला घरत, नितीन पाटील, दीपक बेहरे, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, उरण तालुका सरचिटणीस रूपेश धुमाळ, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, मोतीराम ठोंबरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला, तर प्रदेश कार्याध्यक्ष चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Check Also

भाजप सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करा -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण

शिवसेना उबाठा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश अलिबाग : प्रतिनिधीसध्या भाजपचे सदस्य नोंदणी महाअभियान सुरू आहे. या …

Leave a Reply