Wednesday , February 8 2023
Breaking News

चाकूच्या धाकाने लुटणारी चौकडी जेरबंद, दीड लाखाचा माल हस्तगत

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

चाकूच्या धाक दाखवून चौक येथील कृष्णा सीताराम मुकादम (वय 43) यांच्या जवळील सोन्याची चेन, बाली आणि मोबाईल असा दिड लाखाचा ऐवज लुटणार्‍या चौकडीच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

चौकमधील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न हॉटेल येथे शनिवारी (दि. 18) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा मुकादम यांना चार अनोळखी इसमांनी घेरून चाकूचा धाक दाखविला. व त्यांच्या जवळील सोन्याची चेन, मोबाईल, बाली असा दिड लाख रूपये किंमतीचा ऐवज लुटून नेला होता. त्या चौघांनी कृष्णा यांना मारहाणदेखील केली होती. मात्र त्यांनी  हिम्मत दाखवून प्रतिकार करुन चौक पोलीस दूरक्षेत्र येथे धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय बांगर, पोलीस नाईक नितिन शेडगे, सचिन व्हसकोटी, प्रसाद पाटील, हेमंत कोकाटे, रणजित खराडे, महेश खंडागळे, दत्तात्रय किसवे यांनी सीसीटिव्ही फूटेज आणि खबर्‍या मार्फत माहिती घेत चौघा संशयितांना ताब्यात घेतले. ते चौघेही खालापूर तालुक्यातील अट्टल गुन्हेगार असून, त्यांनी   गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून लुटलेला सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply